लाकडाऊन
कामाले गेलो माय न झाला लाकडाऊन ।
प्रश्न पडला बाई आता घराकडं कसे जाऊन ।।
काम – धंदा नाही माय म्हणून पडलो घराबाहेरी ।
कोरोनाच्या नावी आली गावोगाव महामारी ।।
कुठं जाता येईना; कुठं येता येईना ।
कुणाला सांगु गाऱ्हाणी कुणी काही ऐकना ।।
कुणी म्हणे मास्क घाला तर कुणी म्हणे हात धुवा ।
कुणी करे जंतर – मंतर, तर कुणी म्हणी अंतर ठेवा ।।
कुठला हा बाई विषाणू कुठला हा रोग ।
कुठल्या कर्माचे या जीवनी भोगून राहिलो भोग ।।
काम गेला हातातून गावाकडं यायची लागली घाई ।
कुणाला मारु हाक आता काही उमजत नाही ।।