◼️ बोधकथा : प्रयत्न…हाच मार्ग

प्रयत्न…हाच मार्ग


एक काळातली गोष्ट आहे कि एक शिष्य त्याच्या गुरूंचा खूप आदर-सन्मान करत असे. गुरूंना हि त्या शिष्य विषयी खूप प्रेम वाटत असे. परंतु तो शिष्य अभ्यासाविषयी खूप आळस करत होता.

नेहमी अभ्यासापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून आजची कामे उद्यावर ढकलता येतील.

आता गुरुजींना पण त्या शिष्या विषयी खूप चिंता वाटू लागली होती, त्यांना हि भीती होती कि हा जीवनाच्या संघर्ष्यात हरणार तर नाही ना? आळसामध्ये कोणत्याही वक्तीला कर्मशुन्य बनवण्याची पूर्ण ताकत असते हे गुरुजी जाणून होते.

अशी व्यक्ती कोणतेही कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असते. आणि आलासी व्यक्तींमध्ये जलद निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जरी निर्णय घेतला तरी तो लगेच कामात आणणे त्यांना जमत नाही, आणि नशीबाने मिळणाऱ्या संधींचा फायदा उठवण्याच्या कलेमध्येही ते कुशल होतात.

गुरूंनी आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी त्याच्या मनात एक योजना आखली.

एके दिवशी शिष्याच्या हातात काळ्या दगडाचा तुकडा देऊन गुरुजी म्हणाले – “मी तुला जादुई दगडाचा तुकडा दोन दिवसाठी देत आहे आणि मी दुसर्‍या गावात जात आहे. तु ज्या लोखंडी वस्तूला स्पर्श करशील त्याचे सोन्यात रुपांतर होईल. पण लक्षात ठेव सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी मी तो दगड तुझ्याकडून परत घेईन. “

शिष्य हि संधी मिळाल्या मुळे खूप खुश झाला, परंतु आळशी असल्यामुळे त्याने पहिला दिवस हाच विचार करण्यात घालवला कि जेंव्हा त्याच्या जवळ भरपूर सोनं असेल त्यावेळी तो किती प्रसन्न, खुश आणि संतुष्ट असेल, एवढे नोकर चाकर असतील कि त्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा उठाव लागणार नाही.

दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होते कि सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस आहे.

त्याने मनाशी पक्का ठरवलं कि गुरुजींनी दिलेल्या काळ्या दगडाचा आज पुरे पूर फायदा उठवायचा. त्याने ठरवलं कि तो बाजारात जाईल आणि लोखंडाचे मोठं मोठे सामान विकत घेईन आणि त्याला सोन्यात परावर्तित करेन.

दिवस पुढे सरत चालला होता, परंतु तो अजून ह्याच विचारात होता कि अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, कधीही बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ शकतो.

त्याने ठरवलं कि दुपारचं जेवण झालं कि सामान घ्यायला बाजारात जायचे. परंतु जेवल्यानंतर त्याला विश्राम करण्याची सवय होती. आणि त्याने बाजारात जाण्याऐवजी थोडा आराम करण्याचा विचार केला.

परंतु आळशी असा तोह पूर्णपणे गाढ झोपी गेला, आणि जेंव्हा उठला तेंव्हा कळले कि सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे.

आणि आता तो वेगाने बाजाराकडे पळू लागला होता, परंतु रस्त्यातच त्याला गुरुजी भेटले आणि त्यांना बघता क्षणी त्यांचे पाय धरून तो त्यांची विनवणी करू लागला कि अजून एक दिवस त्याला तो दगड देण्यात यावा.

पण गुरुजी ऐकायला तयार नव्हते आणि शिष्याच श्रीमंत व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहील. परंतु ह्या घटने वरून शिष्याला खूप मोठी समज मिळाली, त्याला त्याच्या आळशी स्वभावावर खूप वाईट वाटत होते.

त्याला समजले कि आळस हा त्याच्या आयुष्याला शाप आहे.आणि त्याने प्रण घेतला कि तो आज पासून कोणत्याही कामापासून दूर पाळणार नाही आणि आयुष्यात कष्टाला खूप प्राध्यान्य देऊन एक सक्रिय व्यक्ती बनून दाखवेन.

मित्रांनो, जीवनात आपल्याला एकापेक्षा एक संधी उपलब्ध होत असतात, परंतु खूप लोग ह्या संधी केवळ आळसा मुळे वाया घालवतात.

म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो कि जर तुम्हाला यशस्वी, आनंदी, श्रीमंत व्हायचं असेल तर आळस हा सोडावाच लागेल आणि आपल्यामध्ये विवेक, कर्म जागृती ह्यासारख्या गुणांना विकसित करायला हवे.

जेंव्हा केंव्हाहि कोणतेही आवश्यक काम टाळण्याचा विचार तुमच्या मनात आला तर स्वतःला एक प्रश्न विचार –“आज का नाही?”

◼️ संकलन : आकाश अडबाले, नांदगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *