🔴बघ प्रीतीचे हसणे गुलाबी
बघ प्रीतीचे हसणे गुलाबी
शब्दांचा वर्षाव करीत…
ऐक, भास्कर राहा निवांत
या श्रावणातल्या सरीत…
तार प्रीतीची छेडून बघ तू
निघतील सूर ओळखीचे…
तुझीच रे ती आहे प्रीती
अतुट नाते युगा-युगाचे …
शांत रहा तू ,चिडू नको रे
नको होऊ तुफान, वादळ …
हाती घेऊन हात प्रीतीचा
हसत रहा तू खळखळ…
तुझ्या हृदयाच्या कप्प्यात
परत प्रीतीला तू सहारा दे…
लागू नये दृष्ट कुणाची म्हणून,
दिवस रात्र तिला पहारा दे…