काव्यरंग : कस्तुरी अत्तर ; नितु. नितेश खरोले,चोपा

 कस्तुरी अत्तर


तू काळजाला थिजवून गेली
पण मनाला भिडली नाही
कशी सांग आलीस अगंतुक
ह्रुदयात धागे जोडली नाही

गीत गात गेलीस काही
भाव मजशी कळला नाही
येता समीप चोरली नजर तू
अन् डोळ्यात काजवा जळला नाही

गाली हसली जरा लाजली
निरागसता ,ते मी काय समजू
माझ्या स्वप्नी मीच गुंतलो
माझ्याच मनास मी लागलो विझवू

तू तर एक परी,गोड बाहुली
भाव समजणे जमले नाही
आवड तुझी खेळ खेळता
जाणून सारे ,उमगले नाही.

बागेतले तू फुल सुंदर
कसा हरवलो तुझ्यात मी भ्रमर
अश्याच असती यातना जोवर
नाही बांधणार मी घर तोवर

तुझ्या दिशेला माझे नसणे
आठवणीत मी एकला हसणे
जरी भास हा तुझा निरंतर
तू या जीवनी कस्तुरी अत्तर

तू माझ्या साठी कस्तुरी अत्तर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *