गत 24 तासात 104 कोरोनामुक्त ; 112 पॉझिटिव्ह

गत 24 तासात 104 कोरोनामुक्त ; 112 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 24,242 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1313

चंद्रपूर, दि. 23 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 112 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 968 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 242 झाली आहे. सध्या 1313 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 55 हजार 995 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 24 हजार 142 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 413 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 374, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 112 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 38, चंद्रपूर तालुका नऊ,  बल्लारपूर 10, भद्रावती नऊ, ब्रम्हपुरी आठ, नागभिड तीन, सिंदेवाही सहा, मूल पाच, सावली तीन, पोंभुर्णा एक, राजूरा तीन, चिमूर पाच, वरोरा पाच, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *