◼️ चारोळी काव्यप्रकाराबद्दल माझे विचार

मराठी चारोळीबद्दल माझे विचार

चारोळी काव्यप्रकारात २ व ४ थ्या ओळीत यमक साधल्या जाते,त्याचबरोबर काही वेळा सर्वच ओळीत यमक साधल्या जाते. चारोळीत कवी एखादा प्रसंग,विषय मांडतात,सारांश सांगतात व ती पूर्ण कविता असते. अत्यंत भावनात्मक असा हा काव्यप्रकार म्हणावा लागेल.

🔴 चारोळी (निःसंदिग्धीकरण)

◼️चारोळी (कविता) – कवितेचा एक प्रकार.
◼️चारोळी (सुकामेवा) – चार या वनस्पतीचे बी. एक प्रकारचा सुकामेवा.

🔴 चारोळीबद्दल..माझे वैयक्तिक विचारमंथन-

चारोळी काव्याचा आकृतिबंध नावांतच सामावला आहे.चार ओळी (four line)मध्ये लिहल्या गेलेल्या कविता म्हणजे चारोळी.
चारोळी काव्यप्रकारात २ व ४ थ्या ओळीत यमक साधल्या जाते,त्याचबरोबर काही वेळा सर्वच ओळीत यमक साधल्या जाते.
चारोळीत कवी एखादा प्रसंग,विषय मांडतात,सारांश सांगतात व ती पूर्ण कविता असते.अत्यंत भावनात्मक असा हा काव्यप्रकार म्हणावा लागेल.

चार-ओळी हा शब्द कवितेचे बाह्यांग चार अक्षरांत व्यक्त करतो,मात्र प्रचलित बोलीत चारअक्षरी शब्द ‘ चारोळी ‘असा झाला.या शब्दाचे वेगळे गुणात्मक अंतरंगही लक्ष वेधून घेते,चारोळी हा पदार्थ मराठी प्रांतात पूर्वीपासून लोकप्रिय आहे.मराठी साहित्यातही चारोळी लेखनप्रकार प्रिय आहे.
सहज तुलना करता,स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चारोळी या पदार्थांशी नाव व गुणातही सार्धम्य साधल्या गेल्याचे दिसते.त्यामुळे चारोळी कविता म्हणजे अल्पाक्षरी, छोटा आकृतिबंध व त्याचबरोबर चारोळी या पदार्थासारखा पौष्टिक, गुणवर्धक व मनाला शांती देणारा असे म्हणण्याचा मोह होतो.

🔴चारोळी कशी लिहल्या जाते ते आपण पुढे पाहू..

जगा जन्म देणारा उदर तू

तरी हा नर ना दाखवी दया…

कुणाची राखी, कुणाचा पदर तू

तरी होतेस तू निर्भया …

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

🔶🔴🔶🔴🔶🔰🔶🔴🔶🔴🔶

🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶

सोशल मिडीयाचा प्रसार वाढल्यानंतर चारोळी लेखकांना मोठे व्यासपीठ मिळाले व चारोळी मोठ्या प्रमाणात लिहल्या जातेय.
आम्ही कवीमंडळींना हा प्रकार आपला वाटतो, असे मला जाणवते. माझ्या या विचारांवर आपली प्रतिक्रिया कळवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *