◼️ काव्यरंग : सुंदर भारत


◼️सुंदर भारत

आहे आपला भारत सुंदर
निसर्गानी उपवन नटलेला ।
चला ठेवूनी स्वच्छ निरोगी
आपण आपल्या समाजाला ।।

करुन आपले स्वतः चे काम
भारताची जगात आहे शान ।
गांव, शहर, जंगल अभियान
म्हणून राहतो करुनी ऊंच मान ।।

पर्यावरण फुलूनी सुंदर दिसे
असा भारत देश आहे महान ।
स्फूर्ति देणारे येथेच आमचे
राम, कृष्ण आणि हनुमान ।।

स्वर्गाहूनही सुंदर अशी रचना
केली परमेश्वरानी तो हा भारत ।
सर्वांना प्रेमाने वागणूक देणारा
सर्व जाती धर्माचा असा भारत ।।

अभिमान आहे मला या देशाचा
माझा जन्म ईथे झाला आहे ।
अजून वाटते मला आजही
सुंदर छान स्वतंत्र भारत आहे ।।

◼️महेन्द्र सोनेवाने, “यशोमन”गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *