◼️ काव्यरंग : बे दुणे चार

◼️बे दुणे चार

बे एके बे
बे दुणे चार
दाम दुप्पट
किंमत फार….//

पाढयांचे धडे
अंकगणिते
वर्ग काढणे
उजळणी ते…. //

बे दीड तीन
अडीच दुणे पाच
पाव पाव अर्धा
सव्वा करी नाच…. //

जोडया जुळेना
तेहतीस छत्तीस
सावत्र भाऊ
त्रेपन्न पस्तीस… //

दोनाचे चार
चाराचे आठ
आठाचे सोळा
डझन मोठ….//

शुन्य हा गोल
वजनदार
तर्क सखोल
तज्ज्ञ होणार…. //

बैलाला शिंगे दोन
पाय चार शेपूट एक
तोंडी चारा पाणी
वरीसभर कामे अनेक…//

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *