◼️ काव्यरंग : बे दुणे चार

◼️बे दुणे चार

बे एक बे बे दुणे चार
करावा आपण सारासार विचार
सगुणांचा आनंदाने करावा गुणाकार
त्यानेच मिळेल आपुल्या जीवन नवा आकार //1//

दुर्गुणांची करावी वजावट
कमी होईल जीवनातील कटकट
आपल्यातील ज्ञान दानाने करावा गुणाकार
ज्ञानवर्धक भूमिकेचा करावा स्वीकार //2//

बे एक बे बे दुणे चार
आयुष्याच्या पाढा अवघड फ़ार
आयुष्याचा पाढा रेटत
जगावे जीवन आपुले //3//

आयुष्याचे गणित आपण ओळखावे
सन्मार्ग अन सदभावाने जीवन काटावे
कुणाशी हि नको वैर दावे फार
असावे सर्वांशी बे दुणे चार //4//

🔴दत्ता विष्णू खुळे
तळणी ता मंठा जि जालना
सदस्य मराठीचे शिलेदार समुह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *