◼️ काव्यरंग : ताईचा माझ्या वाढदिवस….

◼️ताईचा माझ्या वाढदिवस….

तूझा वाढदिवस म्हणजे एक अनमोल आठवण…
तूझा वाढदिवस एक सुंदर स्वप्न…
तूझा वाढदिवस एक यशांच पहिलं पाऊल…
तूझा वाढदिवस म्हणजे खऱ्या आनंदाची चाहुल…

आपल्या सुंदर नात्याला
कुणाची नजर ना लागो…
आणि तूझे माझे नाते
असचं सुखाचं राहो…

उमलत्या फुलांनी तूला जीवनभर
बहरण्याचं वरदान द्यावं…
चंद्र, सूर्य, ताऱ्यांनी तूला
दीर्घ आयुष्याचं वरदान द्यावं…

आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षांनी तूला…
स्वत:च्या पंखावर विश्वास ठेवण्याचं वरदान द्यावं…

तुझ्या वाढदिवसादिवशी तूझा आयुष्य…
सुख, संपत्ती, यश आणि वैभवाने समृद्ध व्हावं…
तूला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा….
माझ्या गोड शब्दांनी द्यावं…

कतृत्वाच्या प्रत्येक वळणावर
तुझ्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटावा…
हीच आमची इच्छा
वाढदिवसाच्या माझ्या ताईला मनापासून शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *