◼️ काव्यरंग : बे दुणे चार ✍️सदस्य मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि.०७/०४/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न‘ स्पर्धेतील ‘बे दुणे चार’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना.

🔻 🔻🔻बेदुणे चार🔻🔻🔻

भकास गावे,भकास वस्ती|
हसायची का कुणास सक्ती?||१||

उदास छाया मना भिवविती|
दु:खाची का सोबत असती||२||

खेळ मांडून बसली नियती|
कसे जगावे कुणा माहिती?||३||

वावटळी दु:खाच्या उठती|
सुख उडे का वाऱ्यावरती||४||

विखरूनी गेली सारी नाती|
कोण सगे ,कोण सोबती?||५||

संसारी या दु:खाचे चटके|
सौख्याला का करती परके?||६||

दु:खा बघूनी दूर पळता|
मेळ कसा बसेल आता||७||

बे दुणे चार नियम असता|
इथे कसला हिशेब लिहिता||८||

हातचा आनंदाचा घेता|
ठरे नियतीचा हिशेब खोटा?||९||

दु:खा विसरा,सुखा स्मरा ना!|
दारी येईल हसत बघा ना||१०||

फुले अंगण व्दिगुणी सुखाने|
आनंदाचे सुभग तराणे||११||

रचना : वृंदा (चित्रा)करमरकर
सांगली, जिल्हा:सांगली
©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
➕➖➗✖️💞➿💞✖️➗➖➕

🔷बे दुणे चार

बे दुणे चार मंत्र मानवा
कदापि तू विसरू नको
क्षणभंगूर या जीवनात
कधी कुणा दुखवू नको.

जीर्ण ते झोपडे म्हणूनी
छाया डोईची काढू नको..
प्रेम जिव्हाळा असे तयां
बुरूज कधी रे पाडू नको

नात्यांचा तू कर गुणाकार
उणाकार कधी करू नको,
अमीरजादा बनूनिया तू
मायबापांना विसरू नको

कावा शकुनीचा मनी अन्
डोळ्यात कपटी नशा नको
घे मानवा उंच तू रे भरारी
केवळ जगाचा हशा नको.

एकदुजाचे सांडून रक्त
बीज द्वेषाचे पेरू नको,
सत्याचा दाबूनी गळा
वार झोपेत करू नको.

सौ.सविता पाटील ठाकरे.
सिलवासा,दादरा नगर हवेली.
©️प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह
➕➖➗✖️💞➿💞✖️➗➖➕

◼️बे दुणे चार

लगीनघाई
संकटे फार
कसे जुळेल
बे दुणे चार //

वाजंत्रीविना
ना गलबला
वधुवरांच्या
गळ्यात माला//

बे दुणे चार
संकल्पचित्ती
टाळेबंदीची
वाटते भिती //

पाच पन्नास
व्हराडी साथी
लग्न लागती
साभार निती //

लग्न खर्चात
झाली कपात
बाप मुलीचा
राहे सुखात //

रीत अशीच
अखंड राहो
हुंडा मुक्तीचे
सुदिन येवो //

दत्ता काजळे उस्मानाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

🔻🔻🔻🔻✍️🔻🔻🔻🔻
मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *