◼️चिंतन : नियतीचा डाव

🔴 नियतीचा डाव

” नियतीपुढे कुणाचे
काहीच चालत नाही
मनातील इच्छा आकांक्षा
सर्व काही मनातच राही “

नियतीपुढे खरंच कुणाचे काहीच चालत नाही. आज आपण बघतो की, “एवढासा तो कोरोना ‘ पण त्याने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे.किती तरी चांगली माणसं यात मृत्युमुखी पडलेली आपण पाहिली. माझी जिवलग मैत्रीण अतिशय परोपकारी, कोणाच्याही मदतीला धावून जाणारी, समाजसेवा करणारी परंतु कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडू शकली नाही. मग तिने केलेले सत्कर्म कुठेच उभे राहू शकले नाही का ? असा विचार मनात येतो. परंतु नियतीच्या मनात काय आहे? हे आपण ओळखू शकत नाही.

जन्माला आला
मृत्यू ना टळला
गर्व मानवा
करिसी कसला..!

जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत चांगलं काम, सत्कृत्य करत राहू, माणुसकी हा धर्म पाळू.कारण माझ्या व तुमच्या हाती काहीच नाही.

◼️✍️ लेखिका / कवयत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *