◼️ वैचारिक लेख : मुलीने लग्नाचा निर्णय घेतांना..

◼️मुलीने लग्नाचा निर्णय घेतांना…

लग्न म्हणजे मुलीच्या जीवनातील अत्यंत आनंदी व महत्वाचा असा क्षण आणि तो खास क्षण बनविण्यासाठी सर्वांनी शक्य तितका प्रयत्न करावा, तिला मदत करावी, तिची साथ द्यावी.
मुलींनी लग्नाचा विचार करताना निव्वळ चेहऱ्याला महत्त्व देऊ नये; तसेच धनाला ही महत्त्व देऊ नये, या दोन्ही गोष्टींना मुळीच महत्व देऊ नये अस नाही, पण खूपच जास्त महत्व देऊ नये.
तिने महत्व द्यावं ते मनाला, स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या आवडीला. तिने लग्नाचा निर्णय खुप विचार करून घ्यावा, समोरच भविष्य, त्यातील आपली भूमिका काय असेल, हे समजून घ्यावं.
तिने अशा जोडीदाराची निवड करावी, जो तिला कधी एकटं सोडणार नाही, तिची जन्मभर साथ निभावेल, तिच्या सर्व इच्छांना, सुख- दुःखांना स्वतःच सुख दुःख मानील; अशाच जोडीदाराची तिने निवड करावी.
निर्णय घेताना कुणाच्या दबावाखाली निर्णय घेऊ नये. आपल्या आई – बाबांना विश्वासात घ्याव व त्यांच्याशी मनमोकळ करून आपला निर्णय कळवावा, कारण नवऱ्याच्या घरी तिला स्वतःला जीवन घालवायचं असत; दुसरे कुणी ही तिची जागा घेऊ शकत नाही, प्रत्येक जण तिला मदत करेल; पण नवऱ्या घरी शेवटी तिलाच नांदायाच असत ना…
पैसा,व्यवस्थित घर, राहण्याची सुविधा, सभोवतालची मंडळी, परिसर, येण्या-जाण्याची सुविधा, रंग-रूप तिने सगळी कडे लक्ष द्यावं; पण विशेष करून तिने स्वभावाला जास्त महत्व द्यावं.
तिने निर्व्यसनीच मुलाची निवड करावी. म्हणजे व्यसनी मुल खराब असतात, अस नाही. पण समोर खुप अडचणींना तिला सामोरं जाव लागू शकते.
तिने नवऱ्याला व्यवस्थित लाईन मध्येच ठेवावं; इतरत्र भटकू देऊ नये, तिने लग्नाच्या वेळी घेतलेल्या व स्त्री साठी असणाऱ्या सर्व वाचनाचं पालन करावं,ते खुप महत्वाचं आहे, तिने पतीला परमेश्वर मानावं की मानू नये, हे मी सांगत नाही; मात्र तिने पतीला आपला अविभाज्य अंग त्याला समजावं, त्याची शेवट पर्यंत साथ द्यावी. त्याच्या प्रत्येक सुख दुःखात सामील व्हावं व नारोबा मुलाने ही आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी.
कोणता ही निर्णय एकटीने घेऊ नये. कुटुंबासाठी तिने वेळ द्यावा. कुटुंब तुटणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, आपल्या नवऱ्याची, मुलाबाळांची व सासू सासऱ्यांची काळजी तिने घ्यावी.
तिने सासू सासऱ्यांमध्ये आपल्या आईवडिलांना बघावं, त्यांच्याशी प्रेमाने वागावं; त्यांची काळजी घ्यावी.
शक्यतो त्यांच्याशी भांडण करन टाळावं; मात्र त्याचा असा अर्थ होत नाही, तिने प्रत्येकच गोष्ट मानावी; मात्र योग्य, सत्य गोष्टीला महत्व द्यावं. तिने मुळीच अत्याचार सहन करू नये, मात्र संसार करताना दोन्ही जिवांनी समझदारीने काम करावं. एकमेकांच्या इच्छांकडे लक्ष द्यावं, एकमेकांसाठी हे खुप महत्वाचं आहे.
लग्न म्हणजे मुलीच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दुसरा टप्पा. आई बाबा तिला लहानाचं मोठं करतात, तिला व्यवस्थित शिकवतात, तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात; कशाची ही कमी पडू देत नाही; पण आपल्या परीने. कारण सर्वांचीच आर्थिक परिस्थिती एकसारखी नसते व विचार सरणी सुध्दा वेगवेगळी असते, तरी सुध्दा प्रत्येक आई वडील आपल्या मुलीच्या व मुलाच्या सुख आणि आनंदाचीच परवा करतो.
आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हवाली करताना त्यांना दुःख होतो, त्यांना चिंता असते. त्यामुळे आई वडील आपल्या भल्याची सोचत नाही, अस मुलीने समजू नये; तसेच नवऱ्या मुलाने ही आपल्या सासू-सासऱ्यांना आश्वसत करावं. त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांना ही आपलं आई वडील मानावं, त्यांची ही काळजी घ्यावी; पण स्वतःच्या आईवडिलांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये.
नवऱ्याने समाज हिताला प्राधान्य द्याव. देशावर जिवापाड प्रेम करावं, पण आपल्या कुटुंबाकडे ही दुर्लक्ष करू नये. शक्य तितकं आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी सुध्दा घ्यावी.
नवऱ्याने कामात इतकं ही व्यस्त होऊ नये की पत्नी मूलबाळ व आईवडिलांना वेळ देऊ शकणार नाही.
नवरा आणि नवरीने मिळून मिसळून सर्वांनी प्रेम पूर्वक वागून; आपल जीवन सफल करावं. प्रत्येक लहान क्षणाला खास बनवाव, घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवावं.
लहान लहान गोष्टीत आनंद शोधावा. इतरांना ही वेळ द्यावं, दुसऱ्यांसाठी ही जगून बघाव. इतरांना कष्ट देऊ नये, घरात आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करावा, पण कुणालाही डोक्यावर घेऊ नये. प्रत्येकानं जबाबदारीने वागावं. घरात प्रत्येकाला आपल मत मांडण्याच स्वातंत्र्य असावं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सारखं महत्व असावं. प्रत्येकाने कुटुंबासाठी करावं, हेवेदावे त्यात आड आणू नये.
मुलीने घरातील सुख शांती बनवून ठेवावी, लहान सहान गोष्टीवर चिडचिड करू नये. मुलाने ही वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नये.
दोघांनी ही सुखी समाधानाने आपल संपुर्ण आयुष्य हासत खेळत जगावं, मुलांना आत्मनिर्भर बनवाव. त्यांना योग्य मार्गदर्शन करावं, आपले प्रत्येक निर्णय त्यांच्यावर थोपवू नये; शेवटी तेही स्वतंत्र जीव असतात. ठीक आहे माझ्या प्रेमळ वाचक मित्रांनो, पुन्हा भेटून याच ठिकाणी सप्तरंग साप्ताहिका मध्ये.
तो पर्यंत काळजी घ्या. आनंदी राहा, सकारात्मक रहा.

◼️✍️  लेखक  :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *