◼️ काव्यरंग : निरागस

◼️निरागस

निरागस मन तिचे ,
दडपून जगत आहे ।
केव्हाची ती एकटीच ,
हरवून बघत आहे ॥

कधी बघितल्या स्वप्नांना ,
पुर्णत्वाचे रुप देत आहे ।
निशब्द अशा प्रेमाची ,
ती वाट बघत आहे ॥

तिच्या निरागस हास्यानं ,
कळी उमलत आहे ।
त्यातून दरवडणारा सुगंध ,
मनास वेड लावत आहे ॥

एक निरागस चेहरा ,
अल्लड प्रसन्न आहे ।
आपलं सर्व विसरुन ,
कोणाची वाट बघत आहे ॥

तिचे निरागस सौंदर्य ,
कुणाची पर्वा करीत आहे ।
डोळयातल्या पापण्याही ,
थोडयाशा पाण्यावल्या आहे ।।

⬛ ✍️  शब्दांकन 🔰

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *