🔰 काव्यरंग : लढाई…..

⬛ लढाई…..

अरे हो जरासे जागे फिरू नकोस मागे
प्रत्येक लढवय्याचा येथे उध्दार आहे…
आहे लढाई मोठी आहे तुझी कसोटी
उतर मैदाणात आता बाकी वार आहे…
समजून घे तू आता जग बाजार आहे
प्रत्येक इमान येथे लाचार आहे…
काढून फेक म्यान चमकू दे तलवार
आजमावून घे स्वतःला बाकी उधार आहे…
पाहू नको जागाला तू एकटा निघाला
तुला तुझ्या जीवनाची नवी पुकार आहे…
समजून घे आता जोवर जळणार नाही चिता
जीवनाच्या प्रत्येक घडीला युद्ध वारंवार आहे…
येऊ दे वादळे पावसाळे तापते उन्हाळे
एक ना एक दिवस बाग फुलणार आहे…
जीवन एक प्रश्नसंच तू परीक्षार्थी आहे
आणि प्रत्येक प्रश्न येथे सुटणार आहे…
लपवून काय लपणार जग खुलेआम आहे
प्रत्येकाचे बींग येथे फुटणार आहे…
ज्याने केला प्रहार तोच जिंकणार आहे
आणि जिंकणाऱ्या पुढेच दुनिया झुकणार आहे…

९६८२१३००८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *