◼️ काव्यरंग : काळजी घ्या फक्त


◼️काळजी घ्या फक्त

जगा आणि जगु द्या !
म्हणायचे दिवस आले आता ।
कोरोना भयंकर बिमारी
समाजात मारत बसली लाथा ! ।।१।।

मास्क आणि सॅनिटाइजरचा
वापर दररोज करा ।
नाहीतर शासकीय स्मशानात
मरून जळा किंवा पुरा ।।२।।

एकाच सरणावर जाळली
दहा – वीस मढी !
माणूस म्हणजे काय
बाजारातली मेथीची जुडी ? ।।३।।

इथे कशाचा धर्म ! ना
कशाचे संस्कार ! ।
स्मशानातील मुडद्यांच्या नंबरांचा
फक्त कमी केला भार ।।४।।

सगे सोयरे नातेवाईक
पहायला नाही आले ।
दहाव्या तेराव्याचे संस्कार
घरच्या घरी केले ।।५।।

कोरोनाने शिकवण दिली
आपली माणसं ,प्रेम आणि दया ।
स्वत:एवढी दुसऱ्यावर आपण
खरच ! करतो काहो माया ? ।।६।।

आता स्वत:साठी तरी जगा
हात जोडून ताकित देतो सक्त ।
सामाजिक अंतर ठेऊन
काळजी घ्या फक्त ।।७।।

◼️कवी ,डाॅ. शिवप्रसाद मीननाथ घोडके

मु .पो .पालखेडकर ता .वैजापूर जि. औरंगाबाद भ्रमणध्वनी:९८२३५३२११४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *