◼️ काव्यरंग :  मोबाईल राज 

 मोबाईल राज 

आधुनिक या युगात
मोबाईल राज आले
सारे लोकच आता
मोबाईलमय झाले…

प्रत्येकाजवळ इथे
मोबाईलचा शेट आहे
मित्र मैत्री नींची
रोजच आता भेट आहे…

हॅलो हॅलो बोलण्यात
खुप आता मजा आहे
प्रत्येक जणच इथे
मनाचा राजा आहे…

मोबाईल शिवाय मुलांच
खुपचं आता अडलं आहे
सारं काही पाहणं
त्यातचं तर दडलं आहे…

मोबाईल जवळ असनं
लोकांचा नाद आहे
समोरासमोर बसूनही
जणु एकमेकांचा वाद आहे…

मोबाईलचा अती वापर नको
आपण समजून घेतल पाहिजे
आपल कापड आपल्या अंगावरच
व्यवस्तीत पणे बेतलं पाहिजे…

प्रमाणापेक्षा जास्त संपर्क
नको त्या व्यक्तीचा टाळला पाहिजे
प्रत्येकानेच हा नियम
निश्चित पाळला पाहिजे…

कवीवर्य- आत्माराम रामदास शेवाळे
‘शब्दस्नेही’ रा. वाघोली
ता.शेवगाव जि. अहमदनगर ८२७५२००७२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *