◼️ काव्यरंग : रामनवमी

◼️रामनवमी

श्रीरामाच्या नावात आहे ,
एक वचन एक वाणी ।
कर्तव्याचे पालन करुनी ,
त्यांचे कार्य ऐकती कानी ॥

घेता रोज रामनाम अति सुंदर ,
जीवन असे आनंदी रे ।
राम नाम घेता पळती दुःख हे ,
राममंत्र हा सतत जपारे । ।

कर्ता तोच करविता प्रभू ,
भक्तीचा भूकेला आहे राम ।
नामाची संगत ऐकत कोणी ,
सर्वाच्या हृदयात आत्माराम ||

नको प्रपंचाची आसक्ती ,
तोषोनी मन घेते नाम ।
तुझ्या चरणाची रज माथी ,
लावीन मी सदैव श्रीराम ||

चराचरात हा वसते राम ,
आशिष दे मज होई काम ।
श्वास आणि ध्यास तुझारे ,
शेवटी मुखी असो श्रीराम ॥

=====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *