ग्रामीण रुग्णालयाचे काम चार महिन्यात सुरु होणार

चंद्रपुर : जिल्ह्यातील महत्वपूर्ण औद्योगिक शहर म्हणजे घुग्घुस चंद्रपुर शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. परिसरात कोळसा खाणी, सिमेंट कारखाना, कच्चा लोहा, तसेच छोटे मोठे कारखाने असल्यामुळे शहाराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या आसपास आहे कामगार वर्ग, मजुर व कष्टकरी शेतकऱ्यांचा गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील जवळपास तीस गावाचा डोलारा आहे.मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक्स रे, सिज़रिंग व शव विच्छेदन केंद्र नसल्यामुळे रुग्णांना चंद्रपुर येथे जावे लागत आहे.
घुग्घूस येथे 30 बेड चे ग्रामीण रुग्णालय 2014 रोजी मंजूर झाले असून 2018 मध्ये नियोजन देखील करण्यात आले व ग्रामीण रुग्णालयाच्या कामाकरीता 24ऑक्टोबर 2018 अकरा करोड सतरा लाख दहा हजार मंजूर झाले असून नकाशे, अंदाजपत्रक व तांत्रिक कार्यवाही साठी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांना सादर झाले आहे तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यास दोन महिने लागणार आहे सन 2019 मध्ये आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्याने काम चालू झाले नाही मात्र चालू वर्षात 150 लक्ष निधी उपलब्ध असल्यामुळे माहे सप्टेंबर 2020 पासून कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जाते.या गंभीर प्रश्नाकड़े सामाजिक कार्यकर्ता ईबादुल हसन सिद्धीकी यांनी वारंवार शासनाचे लक्ष वेधुन ग्रामीण रुग्नालयाचा मार्ग मोकळा करण्याकरिता सन 2007 पासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री,पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तसेच अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले होते व महाराष्ट्र सरकारने 9जून 2014 ला 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले परंतु ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु झाले नसल्याने पुनः पत्रव्यव्हार केला असता त्यांच्या मागणीला यश येऊन लवकरच ग्रामीण रुग्णालयाचे काम चालू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *