स्व. राजीव गांधींचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी

चंद्रपूर : संगणक क्रांतीचे जनक व आधुनिक भारताचे शिल्पकार स्व. राजीव गांधी भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा ते अवघ्या चाळीस वर्षांचे होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा दिला, त्यामुळे आज आपल्याला प्रगतशील देश दिसून येत आहे. त्यांचे विचार युवकांनी अंगिकाराची गरज असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. ते स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, विनोद दत्तात्रय, प्रकाश देवतळे, रामू तिवारी, नंदू नागरकर, अशोक मत्ते, प्रसन्न शिरवार, कुणाल चहारे यांची उपस्थित होती.
आज जी ‘डिजिटल इंडिया”ची चर्चा सुरू आहे, त्याचे जनक राजीवच. जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारावे, अशी ‘तरूण’ मांडणी तेव्हाच ते करत होते.
त्यांच्याच विचारातून कॉंग्रेसने पुढे जागतिकीकरण आणि आधुनिकीकरणाला वाट करून दिली. मतदाराचे वय २१ वर्षांहून १८ वर्षांवर आणले तेही राजीव गांधींनी.
कारण, त्यांचा नव्या पिढीच्या समंजसपणावर भरवसा होता.
या नव्या भारताचे जन्मदाते राजीवच. राजीव अकाली गेले नसते, तर भारताचे भवितव्य आणखी वेगळ्या शैलीत लिहिले गेले असते. असे देखील खासदार बाळू धानोरकर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *