पालकमंत्री यांच्या हस्ते आत्मभान अभियान लोगोचे अनावरण

 

कोरोना जनजागृतीसाठी विशेष आत्मभान अभियान

चंद्रपूर : कोरोना विषयक सर्वांना माहिती व्हावी व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी नागरिकांना जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आत्मभान अभियान राबविले आहे.या अभियानाचे लोगो अनावरण दिनांक 21 मे रोजी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये. यासाठी जिल्हा प्रशासन महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवित आहे. नागरिकांना कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती व्हावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना विषयक जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.ही जनजागृती मोहीम आता आत्मभान अभियान याअंतर्गत होणार आहे.
असे आहे आत्मभान अभियान: सोशल मीडिया, पोस्टर, चित्रफिती, ऑनलाईन स्पर्धा, ऑडिओ, गीत, नागरिकांचे कोरोना विषयक सर्वेक्षण इत्यादी अनेक मार्गातून आत्मभान अभियान नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. लॉकडाऊन पाळणाऱ्या नागरिकांना पुढील काळामध्ये कोरोना संदर्भात जागृत करणे व प्रत्येक घरांमध्ये यासंदर्भात माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. याचा प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांना सोप्या भाषेत कोरोना संदर्भात जनजागृती व्हावी. आत्मभान अभियान मध्ये स्वयंप्रेरणेने विनामूल्य योगदान देणारे कलाकार तसेच काही क्षेत्रातील नामवंत सुद्धा यामध्ये भाग घेणार आहे.

आत्मभान अभियानामध्ये जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पूजारा, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शितल आमटे-करजगी तसेच पुजा द्विवेदी काम पहात आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती तसेच प्रशासनातील अनेक विभाग या आत्मभान अभियानात जनजागृती संदर्भात सहभागी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *