गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा तीन नवे रुग्ण आढळले पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली 31 तर 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले

( चंद्रपूर सप्तरंग न्युज नेटवर्क )
प्रतिनिधी / गडचिरोली(२९ मे.): जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. काल पर्यंत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या २८ होती मात्र आज २९ मे रोजी सकाळी ९ वाजता पुन्हा तिघाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे . यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१ वर पोहचली आहे तर काल २८ मे रोजी ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
आज नव्याने आढळले रुग्ण हे मुबई येथून आलेले असून मूलचेरा तालुक्यातील २ तर अहेरी तालुक्यातील १ रुग्ण आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
नव्याने आढळलेल्या तीनही रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. दिवसागणित वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभाग गडचिरोली कडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अत्यावश्यक कामे वगळता घरा बाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *