जिल्ह्यातील अॅक्टिव 10 रुग्णांची प्रकृती स्थिर, आतापर्यंत 72 हजार नागरिक जिल्ह्यात दाखल

🔷 जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित
🔷 4 हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
🔷10 हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत
◼️( चंद्रपूर सप्तरंग न्युज नेटवर्क)
चंद्रपूर,( दि. 30 मे ): जिल्ह्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण भरती असून 9 रुग्णांना कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून एकूण 72 हजार ‌412 नागरीक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकुण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. 933 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने, निगेटिव्ह 866 नमुने तर 45 नमुने प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यामध्ये ग्रामस्तरावर 3 हजार 483 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 460 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर, जिल्हास्तरावर 311 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत असे एकूण जिल्ह्यातील 4 हजार 254 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच,62 हजार 232 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 10 हजार 180 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *