◼️(गोंदिया प्रतिनिधी)
सडक अर्जुनी;( दि.01 जून): गोंदिया जिल्ह्यात आज 6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मान्सुनला सुरवात झाली असून सोबतच आलेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान जाले आहे.तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे नारळाच्या झाडाावर विज पडल्याची घटना घडली.तर सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे केळीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या वर्षी 1 जून 2019 ते या वर्षी 31 मे 2020 पर्यंत 12 महिन्यात एकूण 1321.65 मि.मी.पावसाची नोंद झाली असून अपेक्षित पाऊस 1327.49 मि.मी. चा 99.56 टक्के आहे.यावर्षीच्या मान्सून कालावधीत म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत सुध्दा 1327.49 मि.मी.पाऊस अपेक्षित आहे.त्यानुसार आज 6 मि.मी.पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळासह पाऊस झाले. प्रचंड वेगाच्या वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले आहे.शेतात असलेल्या केळीचे झाड पुर्णतःकोलमडले गेले.तर खरेदी केंद्रावर असलेल्या धानपोत्यांचेही नुकसान झाले आहे.गोदामाचे छतही उडाले आहे.वादळीवार्यामुळे झाडे कोलमडल्याने रस्त्यावर पडली गेली आहेत. विद्युत खांबसुध्दा मोडले गेल्याने विद्युत पुरवठा गावपरिसरातील खंडीत झालेला आहे.
