चंद्रपूर मध्ये सात रुग्णांना सुट्टी; ऍक्टिव्ह 3 रुग्णांची प्रकृती स्थिर

🔷 आतापर्यंत 20 रुग्ण कोरोना मुक्त

🔷  ॲक्टिव 3 रुग्णांची प्रकृती स्थिर

◼️ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर,दि. 2 जून: चंद्रपूर जिल्ह्यातील 7 रुग्ण मंगळवार दिनांक 2 जून रोजी कोरोना आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण 20रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 आहे. या तिनही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 1 हजार 13 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 23नमुने, निगेटिव्ह 906 नमुने तर 84 नमुने प्रतीक्षेत आहेत.

ग्रामस्तरावर 3 हजार 110 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 306 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तर जिल्हास्तरावर 322 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत, असे एकूण जिल्ह्यातील 3 हजार 738नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 73 हजार 679नागरिक दाखल झाले आहेत. तसेच, 65 हजार 672 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 8हजार 7 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून रेडझोन मधून प्रवास करून आलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. नवी दिल्ली( एक रूग्ण ), मुंबई( चार रुग्ण), ठाणे ( दोन रुग्ण), पुणे ( सहा रूग्ण ), यवतमाळ ( दोन रुग्ण ), नाशिक (तीन रुग्ण) तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासातील संख्या 5 आहे.

चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण ), 13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण ), व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ),31मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 20 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 3 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *