भंडाऱ्यात सात नवीन रुग्ण आढळले ; कोरोना बाधीतांची संख्या पोहोचली 38 वर

 आतापर्यंत 9 रुग्ण कोरोनामुक्त
 कोरोना बाधितांची संख्या पोहचली 38 वर
 29 क्रियाशील रुग्ण

◼️(चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

भंडारा दि.2 (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे.त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज 2 जून रोजी प्राप्त अहवालापैकी 7 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 38 इतकी झाली आहे.यामध्ये क्रियाशील रुग्ण 29 इतके असून 9 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाला आहे.

साकोली तालुक्यातील 7 रुग्ण आज (2 जून) पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 9 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
आतापर्यंत 2039 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी 38 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 1862 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 139 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

आज 2 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 29 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 326 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 554 भरती आहेत. 1183 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई व इतर राज्यातून 39752 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 27168 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 12584 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *