जिल्हा सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 73 लक्ष रुपये जमा ; प्रशासनाचे मदतीचीचे आवाहन

◼️(चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर, ( दि. 2 जून): कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आपले योगदान राहावे यासाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सेवाभावी संस्था, बचत गट तसेच दानशूर व्यक्तीं पुढे आल्या आहेत.

अन्नधान्यांसह जेवन, आरोग्य उपकरणे उपलब्ध करुन देण्यासोबतच गरजूंना मदतीसाठी निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे.आजपर्यंत जिल्हा सहाय्यता निधी तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचा ओघ वाढू लागला आहे. जिल्हा सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 73 लक्ष रुपये जमा झाले आहेत.
आज प्रामुख्याने जिल्हा सहाय्यता निधीमध्ये महाकाली पॉलिटेक्स प्रायव्हेट लिमि. चंद्रपूरच्या वतीने रु.41 हजार, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूरच्या वतीने रु.36 हजार तर अध्यक्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था तुकुम,चंद्रपूरच्या वतीने रु. 15 हजाराचा धनादेश सहाय्यता निधीस देण्यात आला आहे.
त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये जयंत मामिडवार अध्यक्ष, श्री.संत गजानन गौरवगाथा समिती, चंद्रपूरच्या वतीने रु.26 हजार, चंद्रपूर महानगरपालिकेतील किमान वेतनधारक, स्वच्छता कर्मचारी, कंत्राटी कामगार यांच्याकडून रु.37 हजाराचा धनादेश सहायता निधीस देण्यात आला.

◼️ प्रधानमंत्री सहायता निधीतही आली मदत :

त्यासोबतच पंतप्रधान केअर निधीत काही रक्कम जमा झाली आहे. यात जयंत मामिडवार अध्यक्ष, श्री संत गजानन गौरवगाथा समिती, चंद्रपूरच्या वतीने रु.25 हजार तर अध्यक्ष भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था नवरगावच्या वतीने रु.85 हजाराचा धनादेश देण्यात आला.
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे.
कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *