आता रेफर टू गोंदिया नको, आमदार चंद्रिकापुरे यांची ग्वाही

सडक अर्जुनी, प्रतिनिधी( दि.3 जून) : विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर आरोग्य व्यवस्था यांचा अत्याधुनिक यंत्रणा, इमारत, रिक्त पदे व ईतर कायापालट करून तालुक्यातच दर्जेदार व उत्तम आरोग्य सेवा मिळणार, यासाठी आपले प्रयत्न आहे. विधानसभा क्षेत्रात आरोग्यसेवेला सुदृढ करून येथील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणार, असे प्रतिपादन आ.मनोहरचंद्रिकापुरे यांनी केले.

ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांचेशी (दि.३०) चर्चा केली. यावेळी डॉ.मनोहर मुडेश्वर, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.धुमनखेडे, रतिराम राणे, उद्धव मेहेंदळे, माधव तरोने, डॉ.सुगत चंद्रीकापुरे, सम्राट चंद्रीकापुरे शिवाजी गहाने आदि मान्यवर उपस्थित होते.
आ.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, जनतेचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहावेत. रुग्णालयातच योग्य चाचणी व्हावी, ऑक्सीजन मिळावे, एक्स रे सारखी सुविधा मिळावी. रेफेर टू गोंदिया हे व्हायला नको. यासाठी अद्यावत इमारत सुध्दा हवी. संभाव्य रोगाचे धोके टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रारूप तयार करण्याचा मानस आहे. बांधकाम विभागाकडून जागा व इमारतीचा नकाशा मागविला असून शासनाकडून योग्य निधी उपलब्ध करून घेऊ. यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री डॉ. टोपे, तसेच खासदार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे सहकार्य घेणार असल्याचे यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार पर्यटन इतर बाबीवर आपला भर असून या माध्यमातून तालुक्याचा विकास साधणार, असेही आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *