जिल्ह्यात आज दोन कोरोना मुक्त रुग्णांना सुट्टी ; ॲक्टिव रुग्णसंख्या आता 2

◼️  जिल्ह्यात आज एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.

◼️  एकूणरुग्णांची संख्या 24.

◼️ 198 नमुने प्रतीक्षेत.

◼️ आतापर्यंत 22 रुग्ण कोरोना मुक्त.

◼️ 74 हजारांवर नागरिक जिल्ह्यात दाखल.

◼️ एक हजारावर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात.

🔷 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर, (दि.3 जून ): मुंबईवरून एक जून रोजी आलेल्या जुनोना रोड शिवाजीनगर चंद्रपूर येथील 37 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. यापैकी,आज 2 व्यक्ती कोरोना मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत 22 रुग्ण कोरोना मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे.सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण व एक रुग्ण कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 2 असुन या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण 12 कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहेत. आज जूनोना रोड शिवाजीनगर येथील रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे कंटेनमेंट झोन कार्यरत करण्यात आलेला आहे.सर्व कंटेनमेंट झोनमधील रुग्णाचा व इतर सर्व रुग्णाचा नियमित पाठपुरावा सुरू आहे.कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.तर, सर्व आयएलआय व सारीच्या रुग्णाचे स्वॅब घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 24 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-5, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार, जिल्ह्यामध्ये 1 हजार 155 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 24 नमुने पॉझिटिव्ह, 933 नमुने निगेटिव्ह तर 198 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 3 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 976 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 1 हजार 233 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.तालुकास्तरावर 435 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर, जिल्हास्तरावर 308 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 74 हजार 161 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 66 हजार 412 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 7 हजार 749 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्येआतापर्यत 2 मे (एक रुग्ण), 13 मे (एक रूग्ण),20 मे (एकूण 10 रूग्ण), 23 मे (एकूण 7 रूग्ण), 24 मे (एकूण रूग्ण 2),25 मे (एक रूग्ण),31 मे (एक रुग्ण),2 जून (एक रूग्ण)अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 24 झाले आहेत.आतापर्यत 22 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 24 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता 2 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *