वाघाच्या हल्ल्यात चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथील शेतकरी ठार

चंद्रपूर, (४ जून ) : चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये आपल्या शेतामध्ये काम करित असतानां दबा धरून बसलेल्या वाघाने सायंकाळी ५.३० अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने राज्यपाल दयाराम नागोसे वय ४० वर्षे रा बाम्हणगांव येथील शेतकरी जागीच ठार झाला आहे,

या पूर्वी याच परिसरातील ही चौथी घटना असून,गावाला लगत जंगल असल्याने वाघ व इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात. या पूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला,व सातारा येथील महिलेला वाघाणे ठार मारले होते त्या मुळे या परिसरातील नागरिक वाघाच्या दहशत मध्ये नागरिकामध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे,शवविच्छेदन करण्याकरिता मृत्यदेह चिमूर उपजिल्हा रुगणल्यात नेण्यात आला आहे,शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ,कोडापे वनपाल,वनरक्षक वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *