पळसगाव जाट व वासेरा परिसरात पोलीस व गावातील युवकांची अवैध दारू अड्ड्यावर धाड , मोहसडवा व दारू जप्त

◼️ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)

सिन्देवाही, (४जून):  दिनांक २ रोजी वॉश आऊट मोहीम राबवुन दोन वेगवेगळे पथक तयार करून मौजा पळसगाव जाट व मौजा वासेरा परीसरात मोहीम राबवुन मोठया प्रमाणात मोहा दारू हातभट्टया उध्वस्त केल्या, ज्यामध्ये मौजा पळसगाव जाट येथे १) एकुण १७ नग प्लास्टीक चुगळयामध्ये एकुण ८५० किलो मोहा सडवा रसायन किमंत १,७०,००० रू. २) एकुण ८ नग प्लास्टिक डबक्यामध्ये एकुण ८५ लिटर हातभट्टी मोहादारू किमंत २५५०० रू. ३) देशीदारूच्या निपा एकुण किंमत १३००० रू. असा एकुण २०८५०० रू माल मिळुन आला. तसेच मौजा वासेरा शेतशिवार परीसरात अवैद्य मोहादारू हातभट्टी उध्वस्त करून त्यामध्ये एकुण १२०० किलो मोहासडवा रसायन एकुण किमंत २४०००० रू व इतर साहित्य ७२०० रू असा एकुण २४७२०० रू चा माल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे मौजा पळसगाव जाट व वासेरा येथील अवैधदारू मोहीम मध्ये एकुण ४५५७०० रू माल जप्त करण्यात आला असुन दोन आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिन्देवाही येथील पो.स्टाफ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *