वाघाची दहशत असलेल्या माना टेकडी परिसराची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी

◼️ वन विभागासह, वे.को.ली. विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती, जोरगेवार यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर, ( ५ जून ): शहरालगत असलेल्या माना टेकडी येथे सध्या वाघ आणि बिबट्याची दहशत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मागील काही दिवसांमध्ये या भागात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात येथील ग्रामस्थांचे जनावरे जखमी झाले आहे. दरम्यान काल बिबट्याने बैलावर हल्ला करुन जखमी केले. या घटणांच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसह वेकोली व वनविभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी या परिसारातील झाडी झूडपी साफ करुन लाईटची व्यवस्था करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनविभागाला दिल्यात.

चंद्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा जंगलातील हिंसक प्राणी शहरात शिरल्याच्या घटना घडत आहे. परिणामी मनुष्य आणि वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. दरम्याण शहरा लगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलीचे ढिगारे आहेत. या ढिगा-यांवर झाडी झूडपी मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे जंगल निर्मीत झाले आहे. त्यामूळे आता येथे जंगली प्राण्यांनी आश्रय घेतला आहे. येथे अनेकांना जंगली प्राण्यांचे दर्शन घडले आहे. मात्र आता येथे वाघ आणि बिबट्या या हिंसक प्राण्यांनी आपला बसेरा तयार केला असल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे चारा चारायला गेलेल्या गावक-यांच्या पाळीव जनावरांवर वाघ बिबट्याने हल्ले करुन जखमी केल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहे. या घटनांमध्ये दिवसागणीक वाढ होत चालली आहे. त्यामूळे ग्रामस्थ दहशतीत आहे. दरम्यान काल याच परिसरातील पोडे यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली या हल्यात सदर बैलाला मोठी दुखापत झाली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभुमीवर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी विभागीय वन अधिकारी एल सोनकुसरे, छत्रीय वन अधिकारी राहुल कारेकर, सहायक वनसंरक्षक श्रीनीवास लखमावार, वेकोली सबएरीया मॅनेजर हलदर, यांच्यासह माना टेकडी येथील गावक-यांची उपस्थिती होती. या परिसरात वेकोलीचे ढिगारे आहेत. सध्या स्थितीत या ढिगा-यांवर झाडी झूडपी वाढल्याने जंगल निर्माण झाला आहे. हि बाब लक्षात घेता या ढिगा-यावरील झाडी झूडपी काढण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. तसेच या ठीकाणी मुक्तसंचार असलेल्या हिंसक जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्याही सुचना आमदार किशोर जोरगेवार वन विभागाच्या अधिका-यांना केल्यात. जखमी बैल मालकांला योग्य मोबदला देण्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वनविभागाच्या अधिका-यांना सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *