चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच सिजरद्वारे बाळंतपण शस्त्रक्रिया यशस्वी

◼️(चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)

गडचिरोली-( दि. 6 जून ): आज पर्यंत चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरी करता येणाऱ्या महिलांना अत्यावश्यक स्थितीमध्ये सिझर करावयाचे असल्यास गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात दाखल करावे लागत होते परंतु चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागदेवतेजी, स्त्री रोग तज्ञ डॉ. शिवराम कुमरे, बधिकरण तज्ञ डॉ.डी .दुगाने, बालरोग तज्ञ डॉ.मनोज पेंदाम, वैद्यकीय अधिकारी डॉ.शेखर दोरखंडे यांच्या चमूने नुकतेच एका मातेचे बाळंतपण सीझर द्वारे करून लोकांना सुखद आनंद दिलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
आज पर्यंत चामोर्शी येथे गर्भवती महिलांना अत्यावश्यक परिस्थितीमध्ये सिजर करावयाची सुविधा नव्हती. त्याकरिता त्यांना गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात पाठवण्यात येत होते. बऱ्याचदा ये-जा करण्यास उशीर झाल्यास माता व बाळाला जीवाचा धोकाही पत्करावा लागत होता. परंतु आता चामोर्शी येथेच सिजर करून बाळंतपण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने चामोर्शी परिसरातील गर्भवती महिलांना अत्यावश्यक परिस्थितीमध्येही इतरत्र जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!