जि. प.अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून जिवती पंचायत समितीत सॅनिटयझर व माॅस्कचे वाटप

⭕चंद्रपूर सप्तरंग न्युज __________________

◼️जिवती,शनिवार, दि. ०६ जून.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोणाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी संसर्गजन्य संशयितांची नोंद झाली आहे. त्यामुळे शिथिल संचारबंदीसह खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. अश्यात नागरिकांच्या सेवेसाठी सरकारी कार्यालय आणि तत्संबंधी अत्यावश्यक संस्था सुरू आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांची ये-जा असते. आणि आलेल्या अभ्यागत नागरिकांचा व अधिकारी कर्मचाऱ्यांचा जवळून संपर्क येतो. हे लक्षात घेऊन खबरदारी परतण्यासाठी जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी जिवती पंचायत समितीला भेट देऊन तेथील संवर्ग विकास अधिकारी यांसह उपस्थित कर्मचार्‍यांना सॅनिटयझर व माॅस्कचे वाटप केले. तसेच यावेळी उपस्थित जि. प. सदस्या सौ. कमलाताई राठोड यांसह भाजपा कार्यकर्त्यांनाही त्यांनी स्थानिक पातळीवर वाटपासाठी सॅनिटयझर व माॅस्कचे वाटप केले. तसेच यावेळी त्यांनी संवर्ग विकास अधिकारी श्री रामावत यांच्याकडून कोरोणा पार्श्वभूमीवर चालू असलेल्या कामांचा धावता आढावा घेतला.
याप्रसंगी त्यांसमवेत, पं. स. उपसभापती महेश देवकते, जि. प. सदस्या सौ. कमलाताई राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, दत्ताभाऊ राठोड, नगरसेवक राजेश राठोड, गोविंद टोकरे, आशिष नामवाड, जिवती पं. स. संवर्ग विकास अधिकारी रामावत साहेब तथा आदी मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *