शेतामध्ये आढळला मूतदेह कुजल्या स्वरूपात

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर, (७ जून): नागभिड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळोधी पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाढोना गावापासून 1 किलोमीर अंतरावरील शेतशिवारात गफ्फार वजीर शेख वय 40 वाढोणा, या इसमाचा कुजल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सविस्तर वृत्त असे आहे की सदर इसम आपली आई सईदा वजीर शेख सोबत वाढोणा या गावी राहत होता त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे 10 ते 12 दिवसापूर्वी घरून निघून गेला होता व तेव्हा पासूनच तो बेपत्ता होता त्याच्या आईने त्याची 10 ते 12 दिवसा पासून शोधाशोध केली असता त्याचा कुठेही थांग पत्ता लागला नाही आज अखेर दि 6/6/2020, रोजी शनिवारला वाढोना गावापासून वाढोणा जीवणापुर रोडवर वाढोणा पासुन 1. कि.मी. अंतरावर असलेल्या शेतशिवारातील एका वडाच्या झाडाखाली कुजलेल्या अवस्थेत त्याचा अर्ध नग्न मृतदेह आढळला. मृतदेह कुजल्या अवस्थेत असल्याने मोक्यावर शव विच्छेदन करणे अवश्यक होते परंतु पोलीसांना यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेवटी शविच्छेदन सायंकाळी 6.चे दरम्यान झाले. शेवटी घटना स्थळावरच शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावन्यात आले व मोक्याच्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन डॉ. दिलीप फटिंग नागभीड यांनी केले.

विशेष म्हणजे गावाशेजारी भटकनार्या लावारीस कुत्र्याच्या कळपाने मृतकाच्या शरिराला शिन्नविशिन्न केले. व त्याचा एक उजवा हात सुध्दा कुत्रानी गहाळ केला आहे.
तळोधी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक रोशन शिरसाठ यांचे मार्ग दर्शनाखाली बिट अंमलदार सुरेश पानसे, बलदार पठाण, भाष्कर पिसे, शिपाही तापरे ,राहुल धुडसे,हे करीत आहेत, मृतकाच्या पच्छात पत्नी फीरोजा, एक मुलगा, एक मुलगा, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. मृत्यू चे कारण अद्याप समजले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *