चंद्रपूरचे नायब तहसीलदार भास्करवार यांचा अपघाती मृत्यू

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)
 चंद्रपूर (७ जून) : चंद्रपूरचे नायब तहसिलदार अजय भास्करवार यांचा चंद्रपूर मुल मार्गावरील वलनी फाट्या जवडील अपघातात मुत्यू झाला.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तहसीलदार भास्करवार हे मूल मार्गाने चंद्रपूर कडे आपल्या कारने येत होते. मार्गातील चिचपल्ली जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर झाङावर कार आदळली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनीही दवाखान्यात जाऊन भेट दिली. नेमका अपघात कसा झाला, याची माहिती मिळाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *