पत्रकार रफिक घांची यांना “कोविड योद्धा” पुरस्कार

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)

◼️ ( सुरेशडांगे , विशेष प्रतिनिधी )

चंद्रपूर ,(७ जून ): कोरोना (कोविड १९) महामारीच्या संकट काळात पत्रकारितेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मराठी “पाक्षिक आदर्श वार्ताहर” च्या वतीने दैनिक डहाणू मित्र चे संपादक रफिक घांची यांना “कोविड योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले.

पालघर डहाणू तालुक्यातील कोरोना महामारीच्या संकटामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून निर्भीड पत्रकारिता करणारे रफिक घांची यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती केल्याच्या कार्याची दखल घेऊन पाक्षिक आदर्श पत्रकारचे संपादक पंकजकुमार ध्रुव पाटील यांनी सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन रफिक घांची यांचा गौरव केला.

सामाजिक ऋणाची परतफेड करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम राबविणारे तथा राष्ट्रीय एकात्मता या ध्येयाने प्रेरित असलेले दैनिक डहाणू मित्र चे संपादक रफिक घांची यांना “कोविड योद्धा” म्हणून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *