हमी भावाने कापूस खरेदी न करणाऱ्या तीन जिनिंग प्रेसिंगला नोटीस

◼️ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर,( दि. 8 जून ): जिल्ह्यातील वैभव जिनिंग अॅंन्ड प्रेसिंग पांढरपोणी ता. राजुरा,एन.डी. कॉटन इंडस्ट्रीज टेर्बुवाही  ता.राजुरा, बालाजी जिनिंग अॅंन्ड प्रेसिंग फॅक्टरी ऐन्सा ता. वरोरा तीन जिनिंग-प्रेसिंगने दिनांक 5जून पर्यंत आपल्या जिनिंग व प्रेसिंगचे सीसीआयशी करारनामा केले नाही.तसेच दिनांक 28 मे पासून खाजगी खरेदी सुध्दा बंद केलीआहे.सदर जिनिंग व प्रेसिंग खाजगी,शासकीय कापूस खरेदी प्रक्रीयेत पूर्णपणे सहकार्य करीत नाही.जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही. यावरुन यापुढे या यंत्रणेला खाजगी व हमी भाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या तीनही जिनिंग-प्रेसिंगनी खुलासा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 14 मार्च 2020 पासुन लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे भारतीय कपास निगम लिमिटेड व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या., यांचे तर्फे करण्यात येणारी कापूस खरेदी थांबविण्यात आलेली होती.

दिनांक 27 एप्रिल रोजी भारतीय कापूस पणन महामंडळ मर्यादित (सी.सी.आय) मार्फत पुन्हा कापूस खरेदी सुरु करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन पासून खाजगी खरेदी चालू आहे. या कार्यालयात आयोजित  सभामध्ये आपणास भारतीय कपास निगम लिमिटेड (सी.सी.आय) शी करारनामा करुन हमी भाव दराने कापूस खरेदी करणेबाबत वारंवार सूचित केले होते.

शासनाचे निर्देशानुसार तसेच सी.सी.आयचे करारनामा न करणे, युनिट पुर्ण क्षमतेने न चालविणे, खाजगी,हमी भाव दराने कापूस खरेदी न करणे व परिणामी शासकीय कापुस खरेदीत अडथळे निर्माण करणे इ.बाबीसाठी आपले विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरीचा परवाना रद्द करुन  कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे याचा खुलासा दोन दिवसांचे आत कार्यालयास सादर करावा. अशी निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेममार यांनी दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *