उपविभागीय अधिकारी यांच्या वाहन चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

◼️ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर,(८ जून ) : – दिनांक.०८/०६/२०२० चिमूर तहसील येथे उपविभागीय अधिकारी ( SDM) यांच्या वाहनाचे शासकीय चालक पदावर कार्यरत असणारे दत्तात्रय महादेव कळथे वय ३७ वर्षे हे अंदाजे ३ वर्षांपासून चालक पदावर कार्यरत  होते.  ते शांत स्वभावाचे होते व नियमितपणे चालकाचे काम कर्तव्यदक्ष पणे हाताळायचे. व ते चिमूर तहसील येथील ट्रेजरी ऑफिस ला लागून असलेल्या तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानी राहात होते.

त्याच ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.हे प्रकरण सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान घडले. मेस वाल्यानी निवासस्थानी दिनांक.०७ जून २०२० ला सायंकाळी जेवणाचा डब्बा दिला व दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निवासस्थानी जेवणाचा डब्बा दुपारी १२ वाजता नेऊन दिला असता. वारंवार आवाज मारून दार न उघडल्याने दार का उघडत नाही याबद्दल तहसील च्या कर्मचाऱ्यांना डब्बे वाल्यानी सांगितले तसेच काही अधिकारी निवासस्थानी जाऊन आवाज मारू लागले व दार न उघडले असता आतून दार लावून होते. म्हणून दार तोडले आणि अधिकारी यांनी बघितले कि वाहन चालक गळफास घेऊन फाशी लागले आहे.हि वार्ता तहसील कार्यालयात पसरता सर्वत्र खळबळ माजली.मृतकाचा परिवार हा निवासस्थानी नव्हता व चिमूर पोलिसांना माहिती दिली. शव खाली उतरविले आणि शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले. मृत्यूचे कारण अध्यापही समोर आले नसून चिमूर पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे.व हे निवासस्थान चिमूर तहसील चे तहसीलदार यांच्याकरीता नियोजित होते. आणि तहसीलदार निवासस्थानी राहत नसल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या चालकास ते निवासस्थान रहायला दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *