⭕ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)
गोंदिया ,( ८ जून ): जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ पांढरे सांबर आढळून आले आहे. २०१७ मध्ये गुजरातमधील गीर येथे असेच अल्बिनो सांबर आढळल्याची नोंद आहे. मागील आठवड्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात या अत्यंत दुर्मिळ अल्बिनो पांढऱ्या सांबराची नोंद झाली.
तृणभक्षी असलेले हे हरीण जातीतील पांढरे सांबर वनरक्षक हितेंद्र अनारसे यांना दिसले. राष्ट्रीय उद्यानात नेहमीप्रमाणे पाहणी करत असताना यापूर्वी न पाहिलेल्या हे पांढऱ्या रंगाचे जंगलात जमिनीवर गवतात बसलेला प्राणी पाहून अनारसे आश्चर्य वाटले. भूपृष्ठावर बसलेले हे पांढरे सांबर अगदी दुर्मिळ दिसून आले. या पांढऱ्या सांबराला पाहून अधिकारी व कर्मचारी सुद्धा अवाक झाले. हा सांबर पांढऱ्या रंगाचा असून कानाचा रंग हलका गुलाबी आहे. पिंगट डोळे व तृण आच्छादित भूपृष्ठावर उठून दिसणारा प्राणी असल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका पूनम पाटे यांनी सांगितले.