नागपुरात लॉकडाऊन खुलल्याच्या खुशीत दिली पार्टी ; ७५ लोकांना कोरोनाची झाली लागन

◼️ ७०० लोकांवर क्वारंटाईन होण्याची आली वेळ

( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क)
नागपूर(१०  जून): लॉकडाऊन ‘मिशन बिगीन अगेन’ सोमवारपासून हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच नागपुरात एक “कोरोनाकांड” घडला. शहरातील नाईक तलाव – बांगलादेश परिसरातील चार मित्रांनी केलेल्या एका पार्टीमुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या परिसरातील ७५ हुन अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ७०० हुन अधिक लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
नागपुरातील एक व्यक्तीने आपल्या काही मित्रांना लॉकडाऊन खुलल्याच्या खुशीत पार्टी दिली या पार्टीत त्याने काही शेजाऱ्यांना व काही मित्रांना बोलावले होते. मात्र पार्टीला लागणारे सामान मात्र कोरोना बाधित असलेला सर्वात मोठ्या परिसर म्हणजेच मोमीनपुरा परिसरातून आणले होते अशी चर्चा आहे.
या परिसरातील एक जण आपल्या तीन मित्रांसह मोमीनपुरा परिसरात मांस आणण्यासाठी गेले होते. त्यांनी परिसरात मित्राच्या घरी पार्टी केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या चारपैकी तीन मित्रांची तब्येत बिघडली. खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यात तिघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तोपर्यंत ते परिसरातील अनेकांच्या संपर्कात आले होते. मिळालेल्या माहितीवरून जवळपास ७५ लोकांना तपासणीत लागण झाल्याचे समोर आले आहे. तर या उत्साही पार्टी करणाऱ्या लोकांमुळे ७०० लोकांना विलगीकरण कक्षात जावे लागले.
उपराजधानीत गेल्या दोन दिवसांमध्ये ६७ नवीन करोनाबाधित आढळले असून यापैकी ३६ जणांची नोंद आज मंगळवारी करण्यात आली. शहरातील चार नवीन भागात प्रथमच बाधितांची नोंद झाली. मागील दोन दिवसांत पुन्हा करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
सोमवारी शहरात ३१ बाधित आढळले होते. मंगळवारी त्यात आणखी ३६ जणांची भर पडली आहे. नवीन बाधितांमध्ये नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील ४१, भरतनगर १, विश्वकर्मानगर १, झिंगाबाई टाकळी १, न्यूरॉन्स रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी १ मोमीनपुरा परिसरातील २, झिंगाबाई टाकळी परिसरातील १, मार्टीननगर १, , हंसापुरीतील ४ रुग्णांसह इतरही भागातील काही रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात प्रथमच भरतनगर, झिंगाबाई टाकळी, विश्वकर्मानगर, मार्टीननगर या परिसरात बाधितांची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *