बिबट मृत्यूप्रकरणी १९ आरोपींना घेतले ताब्यात

◼️ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

 सावली,(११जून):– वनपक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपक्षेत्र बीटातील कक्ष क्र १५३४ अंतर्गत साखरी माल येथे डुक्करांची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यु झाल्याची खळबळ जनक घटना  काल (१० जून) रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी वनविभागाने १९ जणांना ताब्यात घेतले आहे.

भोजराज ठाकूर, सुखदेव बांबोळे, आकाश कुमरे, नरेश भोयर, सावजी उराडे, सिरू गेडाम, दशरथ गेडाम, नकटू ठाकूर, विवेक आवळे, रमेश भोयर, राजू भोयर, प्रमोद भोयर, किशोर ठाकूर, सत्यवान गेडाम, वेला बांबोळे, तुळशीराम भोयर, भाऊजी भोयर, किशोर भोयर आणि पुरुषोत्तम सोयाम अशी आरोपींची नावे आहेत. तर एका आरोपिचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.
शेताची नासधुस करत असलेल्या डुकरांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी रानटी डुकरांची शिकार करण्याकरिता सापळा सुरु केला आहे. याकरिता माजी वनमंत्र्यानी मूक संमती दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुरूच आहे. अशाप्रकारचे रानडुकरांची शिकार करण्यासाठी जाळे लावण्यात आले होते. या जाळ्यात साडेतिन वर्षीय बिबट अडकून काल १० जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्युमुखी पडले. आरोपींना ताब्यात घेतले असून या सर्व आरोपीविरुद्ध वाइल्डलाइफ प्रोटेक्शन कायदा १९७२ चे कलम २,९,३९ आणि ५१ लावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *