चंद्रपुरात अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार : खासदार बाळू धानोरकर

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )
चंद्रपूर,( ११ जून ) : जिल्ह्याची ओळख समाजाचे ऋण फेडणारा जिल्हा अशी आहे. मोठ्या प्रमाणात संकटाला धावून संकटावर मात करणारी लोक या जिल्ह्यात आहेत. कोरोनाच्या संकटात देखील आर्थिक व इतर मदत मोठ्या प्रमाणात केल्या गेल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात येत आहे. परंतु रक्त साठविण्याची व्यवस्था मर्यादित असल्यामुळे नागपूर किंवा वर्धा येथील टीमला पाचारन करून जिल्ह्यातील रक्तसाठा तिथे नेण्यात येते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील लोकांना या रक्ताचा फायदा मिळत नसून खाजगी रुग्णालयातून रक्त घ्यावे लागते. त्यामुळे पुढे आपल्या जिल्ह्यातील रक्तसाठा आपल्याच रुग्णाला मिळण्याकरिता जिल्ह्यात अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते महाआघाडी तर्फे ऊर्जानगर येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
यावेळी कॉग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय, रामू तिवारी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकार, अभिजित खंनाडे, लोकेश कोटरंगे, चेतन गाडगे, अभय मस्के, उत्तम रोकडे, प्रदीप ढाले, पंकज ढेंगाडे, सौरभ घोरपडे, शुभम आंबोरकर यांची उपस्थिती होती.
औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. परंतु अनेकदा रक्ताची कमतरता जाणवत असते. त्यामुळे खाजगी रुग्णालयात रक्ताची गरज भागवावी लागते. परंतु खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पैसे आकारण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुदंड सोसावा लागतो. महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्तदाते रक्तदान करीत असतात. परंतु रक्तसाठा करण्यासाठी अपुरी व्यवस्था असल्याने बाहेरील जिल्ह्यात तो रक्तसाठा पाठवावा लागतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील रक्त आता आपल्याच रुग्णाला असे आवाहन करून अत्याधुनिक ब्लड बँक उभारणार असे प्रतिपादन खासदार धानोरकर यांनी दिले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *