चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात एकही पॉझिटिव्ह नाही

( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

◼️  घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला योग्य माहिती द्या : राहुल कर्डिले

Ø  एकूण कोरोना बाधीतांची संख्या 43

Ø  आतापर्यंत 23 बाधीत कोरोना मुक्त

Ø  ॲक्टिव बाधीतांची संख्या 20

Ø  जिल्ह्यात सध्या 11 कंटेनमेंट झोन कार्यरत

चंद्रपूर, दि. 12 जून: जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन’, शहरी, ग्रामीण भागात आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी आरोग्य पथकाला योग्य माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यात 24 तासात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 43 आहे. यापैकी, आतापर्यंत 23 कोरोना बाधीत  कोरोना  मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे.सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक कोरोना बाधित व 19 कोरोना बाधीत कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव बाधीतांची संख्या 20असुन या  सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

◼️12 कंटेनमेंट झोन बंद तर सध्या 11 कंटेनमेंट झोन कार्यरत:

जिल्ह्यात एकूण 23 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 11 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 21 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 48 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 45 नमुने निगेटिव्ह व 3 नमुने प्रतीक्षेत आहेत.

सर्व कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

कोविड-19 संक्रमित 43 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1,हैद्राबाद-1, मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1,  प्रवासाचा कोणताही प्रकारचा इतिहास नसलेले-3, संपर्कातील व्यक्ती – 10 आहेत.

◼️जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती:

जिल्ह्यामध्ये 2 हजार 106 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 43 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 833 नमुने निगेटिव्ह, 216 नमुने प्रतीक्षेत तर 14 नमुने अनिर्नयीत आहेत.

◼️असे आहे जिल्ह्यातील अलगीकरण:

 जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 247 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 504नागरिक,तालुकास्तरावर 436 नागरिक तर, जिल्हास्तरावर 307 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत परराज्यातून,जिल्ह्यातून 77 हजार 203 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 72हजार 900 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 4 हजार 303 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

आतापर्यंतची कोरोना बाधीतांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7बाधीत),24 मे ( एकूण 2  बाधीत), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ), 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत), 7 जून ( 11 बाधीत),9 जून ( एकुण 3बाधीत),10 जून ( एकुण 1 बाधीत),अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 43 झाले आहेत. आतापर्यत 23 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 43 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 20 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *