गोंदिया जिल्ह्यात कतारवरुन आलेले आज चौथ्या दिवशी 14 रुग्ण आढळले

⭕ ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

गोंदिया दि.15 (जिमाका)ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.आज सलग चौथ्या दिवशी आणखी 14 कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. आज 15 जून रोजी प्राप्त अहवालावरून हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून सर्व तिरोडा तालुक्यातील आहेत.त्यातच हे सर्व कतार(खाडी देश)वरुन आलेले रुग्ण आहेत.त्यांना गोंदिया शहरातील विविध संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहेत.10 जून नंतर गोंदिया जिल्ह्यात कतार या देशातून भारतसरकारच्या वंदेभारत अभियानंतर्गत परतलेले आहेत.विमानाने मुंबईत आल्यानंतर हे सरळ गोंदियाला आले असून त्यांची संख्या जवळपास 62 आहे.त्या सर्वांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून यापैकी 17 जणांचे रिपोर्ट गेल्या 4 दिवसात पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.

26 मार्चला पहिला रुग्ण बाधित आढळल्यानंतर सलग 39 दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता.त्यानंतर 19 मे रोजी दोन रुग्ण आढळून आले.त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 21 मे रोजी तब्बल सत्तावीस रुग्ण आढळून आले.त्यानंतरही बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळण्याचे सत्र हे सुरूच होते. 22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी 9 रुग्ण, 29 मे तीन रुग्ण,30 मे रोजी चार रुग्ण,31 मे रोजी एक रुग्ण,2 जून रोजी दोन ,12 जून रोजी एक रुग्ण ,13 जून रोजी एक रुग्ण आणि आज 14 जून रोजी एक आणि आज 15 जून रोजी 14 रुग्ण असे एकूण 66 रुग्ण आतापर्यंत कोरोना बाधित आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *