गडचिरोलीत चार दिवसांच्या विश्रांतीनंतर ३ महिला कोरोना बाधित

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

🔵 दिल्लीहून आलेल्या २ व चंद्रपूर वरून आलेली एक महिला कोरोना बाधित

🔵  आजचा नवीन तीन कोरोना बाधितांमुळे जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५१ तर सक्रिय कोरोना बाधित पुन्हा १०

गडचिरोली,( १६ जून ): काल रात्री मुलचेरा तालुक्यातील नव्याने ३ महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १० झाली. यामुळे जिल्हयात एकुण कोरोना बाधितांची संख्या ५१ झाली. तर ४० कोरोनामुक्त झालेल्यांना यापुर्वीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्या १० सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिघीनाही जिल्ह्यात आल्यानंतर मुलचेरा येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचे वय १८, २१ व ४० वर्षे असल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *