सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १७-जून -२०२०/बुधवार

💁‍♂️ सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १७-जून -२०२०/बुधवार

📣 राज्यात काल 2 हजार 701 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत .

📣 त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख 13 हजार 445 झाली आहे.

📣 तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख 43 हजार पेक्षा जास्त झाली आहे

📣 ११ व्या दिवशी पण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली ,पेट्रोल लिटर मागे ४७ पैशांनी, तर डिझेल लिटर मागे ९३ पैशांनी महाग झाले आहे.

📣 त्यामुळे आज पेट्रोल चे दर 83.62 रुपये प्रति लिटर , तर डिझेलचे दर 73.75 रुपये प्रति लिटर झाले आहे.

📣 भारतातील कोरोना रुग्ण बरं होण्याचा दर 50 टक्क्यांपेक्षा अधिक झालं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती.

📣 भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. .

📣 या परिसरात तैनात असलेले जवान जखमी झाले आहेत तसेच त्यातील २० जणांचा मृत्यू झाला आहे.

📣 दरम्यान आता हिमाचल प्रदेशमध्ये सीमावर्ती भागांत सैन्याला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

📣 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी चांगली बातमी आहे आता घरी बसून डिजिटल पद्धतीने केवायसी प्रक्रिया करता येईल.

📣 तुम्हाला यासाठी बँकेत येण्याची गरज नाही ग्राहकांना एसबीआय कार्डच्या वेबसाइटवर जाऊन KYC पूर्ण करता येणार .

📣 आयसीएआय ची कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट’ १७ जुलै रोजी होणार होती. ती आता २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

📣 तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २७ जुलै २०२० पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.

📣 हवामान विभागाच्या माहितीनुसार,गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र

📣 आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *