मागेल त्याला शेततळे द्या ; आ. किशोर जोरगेवार यांच्या कृषी अधिका-यांना सुचना

🔵  आमदारकिशोर जोरगेवार पोहचले शेतक-यांच्या बांधावर, जाणून घेतल्या समस्या

चंद्रपूर, (१७ जून ): मान्सूनचे आगमत होताच शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला आहे. दरम्यान काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण भागाचा दौरा करत थेट शेतक-यांच्या बांधावर जावून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनियमित पाऊस आणि कोरोनामूळे शेतक-यांपूढे उभे असलेल्या आवाहणाची मला कल्पना आहे. असे सांगत शेतक-यांच्या अडचणी सोडविल्या जातील अशी ग्वाही ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. तसेच मागेल त्याला शेततळे द्या अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कृषिधिका-यांना दिल्यात. यावेळी तालूका कृषिधीकारी वहाते, सहायक कृषिधीकारी गायकवाड, साखवाहीच्या सरपंच छबू बोंडे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक नागेश बोंडे, ग्राम पंचायत सदस्य माया भगत, उज्वला काकडे, ग्रामसेवक देवगडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य विलास भगत, तर शेनगावच्या सरपंच निर्मला मिलमिले, कृषि सहायक अधिकारी पंकज ढेंगणे, तलाठी राहूल भोंगडे, ग्रामसेवक रविंद्र चवरे, ग्राम पंचायत सदस्य राजेश कांबळे, चंद्रकांत वैद्य, मंगेश चटकी, मनोज धांडे, विठ्ठल बंडेवार, प्रभाकर धांडे, आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *