वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार , नागभिड तालुक्यातील घटना

🔴( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

चंद्रपूर (१९ जून) : चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या तुकुम येथील राजेंद्र गनवीर (वय ५५) या शेतकऱ्याला शेतामध्ये वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. काल सायंकाळी राजेंद्र हे शेतात गेले होते. तेव्हा जंगलालगत असलेल्या शेतावर काम करीत असतांना वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्यांना ठार केलं तसेच घटनास्थळावरुन साधारण १५० मीटर दूरपर्यंत त्यांना ओढत नेले. दरम्यान शेतकरी राजेंद्र गनवीर हे सायंकाळी उशीरापर्यंत घरी परत न आल्यानं परिवारातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध घेतली. तेव्हा त्यांना घटनास्थळावर मृत राजेंद्र यांच्या चपला आणि वाघाच्या पंज्याचे ठसे आढळून आले. या घटनेची माहिती कुटुंबातील सदस्यांनी वनविभागाला दिली. रात्री अंधार असल्यानं वनविभागाने सकाळी जाऊन त्यांचा शोध घेतला असता त्यांना शेतकरी राजेंद्र गनवीर यांचा मृतदेह जंगलात अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी मोक्का पंचनामा केला आहे. पुढील कार्यवाही नागभिड वनविभाग करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *