जिल्ह्यात अॅक्टिव्ह बाधितांची संख्या फक्त 16 तर एकूण बाधितांची संख्या 55

🔴 ( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

Ø  आतापर्यंत एकूण 39 बाधित कोरोना मुक्त

Ø  16 कंटेनमेंट झोन बंद तर 9 कंटेनमेंट झोन कार्यरत

Ø  संस्थात्मक अलगीकरणात एक हजारांवर नागरिक

Ø  74 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण

चंद्रपूर, दि. 19 जून: जिल्ह्यात बाधितांची संख्या 55आहे. आतापर्यंत 39 बाधित कोरोना मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे.सध्या ॲक्टिव्ह बाधितांची संख्या 16  आहे. यापैकी, 15 बाधित कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती आहे तर 1 बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेला आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्याचा डबलींग रेट 20.5 आहे.

◼️16 कंटेनमेंट झोन बंद तर 9 कंटेनमेंट झोन कार्यरत:

जिल्ह्यात एकूण 25 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 16 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 9 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.

◼️कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण:

आजपर्यंत एकूण 25 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह व एक नमुना प्रतीक्षेत आहेत.

कोविड-19 संक्रमित 55 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -4, हरियाणा (गुडगाव)-1,ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-1,मुंबई-9, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3,जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती – 14आहेत.

◼️तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा एक, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीन, वरोरा दोन, राजुरा दोन, मुल एक, भद्रावती एक, ब्रह्मपुरी एक, कोरपणा एक, नागभिड एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ दोन, बालाजी वार्ड एक, भिवापूर वार्ड एक, शास्त्रीनगर एक, सुमित्रानगर चार बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 55 वर गेली आहे.

आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधितांची शोध मोहीम:

दिनांक 11 जून पासून आरोग्य सेतू ॲप वरील मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) गंभीर आजार असलेले, कोविडचे संभाव्य लक्षणे असणाऱ्या (अनवेल कोमॉरबीडीटी) व्यक्तींचा डाटा प्राप्त करून मुख्य वैद्यकीय अधिकारी (महानगरपालिका चंद्रपूर), संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना यादी पाठविण्यात येते.सदरील व्यक्तींची आरोग्य तपासणी करून जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित करून व स्वॅब घेवून शोध मोहीम सुरू केलेली आहे.

◼️कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती :

जिल्ह्यामध्ये 2 हजार 771 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 55 नमुने पॉझिटिव्ह, 2 हजार 408 नमुने निगेटिव्ह, 289 नमुने प्रतीक्षेत तर 19अनिर्नयीत  आहेत.

जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1हजार 98 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 406 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तालुकास्तरावर 402नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तर, जिल्हास्तरावर 290 नागरिक  संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 79 हजार 72 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 74 हजार 240 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 832नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

आतापर्यंतचे कोरोना बाधितांचे विवरण :

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 55 झाले आहेत. आतापर्यत 39 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  55 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 16 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *